काल पुण्यात ४ टन मासळी, ८०० टन चिकन आणि २ हजार बोकड…

पुणे, दि. २० जुलै २०२०: आता श्रावण महिना लागणार असून अनेक लोक या महिन्यात मद्यपान आणि मांसाहार जेवण करत नाही तसेच तमाम खवय्यांचा आवडता दिवस म्हणजे
” गटारी “. ज्यामधे एका दिवसात हवे ते मांसाहर पदार्थ प्रत्येक घरात आवडीने करुन खाल्ले जाते.

मात्र कोरोना काळात पुणेकरांनी एक अनोखा कारनामा केला असून आखाडातील शेवटच्या रविवारी ३ ते ४ टन मासळी, ७५० ते ८०० टन चिकन आणि दीड ते दोन हजार बोकडांचे मटण  फस्त केले. पुणेकरांनी सकाळपासूनच दुकांनासमोर रांगा लावल्या होत्या. त्या दुपारी कमी होत गेल्या. तरीही दुकाने बंद होईपर्यंत तुरळक प्रमाणात विक्री सुरूच होती.

सोमवारी अवमस्या आली आहे मात्र त्यावर ही अनेकजण हि मांसाहार जेवण करत नाहीत. मंगळवार पासून श्रावण सुरू होणार म्हणून आषाढातील या शेवटच्या रविवारी सर्वांनी मासांहारावर ताव मारल्याचे दिसून आले. नंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असतो. कित्येकजण दिवाळीपर्यंत मांसाहार करण्याचे टाळतात. या पार्श्‍वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी आवर्जून मांसाहाराचा बेत आखला होता.

दरवर्षी पुणेकर आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार हॉटेल मध्ये जाऊन साजरा करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हॉटेल, खानावळ बंद होत्या. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी निम्म्याने कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाउनमुळे मागणीच्या तुलनेत मटणासाठी बोकड, मासळी, चिकनची कमी आवक झाली. हॉटेल बंद असल्याने पुणेकरांना घरीच आखाड साजरा करावा लागला. लॉकडाऊनच्या परिस्थितीतही आषाढातील शेवटचा रविवार असल्याने मटण, मासळी आणि चिकनची दुकाने संध्याकाळपर्यंत उघडी ठेवण्यास प्रशासनाने मुभा दिली होती. मटण, मासळी, चिकनच्या मागणीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. यामुळे भावातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्‍यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा