दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. यामुळेच त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, दरबार या चित्रपटातील रजनीकांतचा हटके लूक सोशल मिडीयावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
रजनीकांतच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दिवाळीच्या खास क्षणी हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
कसा आहे लूक : या लूकमध्ये रजनीकांत पुन्हा एकदा ऍक्शन लुकमध्ये दिसून येत आहे. जॅकेट, सनग्लासेस आणि हातात बंदुक घेवून असलेला रजनीकांत खूपच डॅशिंग वाटत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, अभिनेता प्रतीक बब्बर, नवाब शाह आणि सुनील शेट्टी इत्यादी कलाकार आहेत. ए. आर. गुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी पोंगल सणाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.