येवले फाऊंडेशन करणार आरोग्य क्षेत्रात काम: नवनाथ येवले

पुरंदर, १५ डिसेंबर २०२०: राज्यात आरोग्य विषयक अनेक समस्या आहेत. यापुढं येवले फाऊंडेशनच्या माध्यमातुन आरोग्य विषय जनजागृती व आरोग्याच्या समस्या विषयी काम करणार आहे, असं मत येवले फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले यांनी व्यक्त केलं. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते.
     भिवडी येथे येवले फाउंडेशनच्यावतीनं आज जागतिक चहा दिनाचं औचित्य साधत तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्या हस्ते दीप्रज्वलनानं या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. ज्ञानोबा मुंडे, सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे, माजी उपसभापती दत्तात्रय काळे, संजय कटके, प्रहार क्रांती आंदोलनाच्या राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सुनिल लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, ग्रामसेवक अविनाश निगडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
    यावेळी पुढं बोलताना येवले म्हणाले की, संपूर्ण राज्यात येवले अमृततुल्यच्या विविध गावात शाख सुरु केल्या आहेत. आता देशभरात येवले अम्रुतुल्यच्या १० हजार शाखा सुरु करुन बेरोजगार युवकांच्या हातांना काम देत, एक प्रकारची रोजगार निर्मिती करण्याचा मानस आहे. याप्रसंगी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी येवले फौंडेशनच्या कामाचं कौतुक केलं. कोरोनाच्या काळात येवले फाउंडेशननं केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. फाउंडेशननं  कोरोना काळात  लोकांना अन्नधान्य, मास्क सॅनिटायजर वाटून संकट काळात आपलं  सामाजिक उत्तर दाईत्व पूर्ण केलं. यावेळी सुत्रसंचालन शेखर पिसे यांनी केलं, तर आभार सुनिल लोणकर यांनी मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा