माढा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी योगेश बोबडे यांची निवड

माढा, २५ ऑगस्ट २०२० :भारतीय जनता पक्षाच्या माढा तालुका अध्यक्षपदी योगेश बोबडे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली टेभुर्णी येथे घेतलेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते योगेश बोबडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष योगेश बोबडे म्हणाले की, पक्षाची ध्येय धोरणे तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोचवून पक्ष बळकटीकरणास महत्त्व देणार असून तालुक्याचा विकास व पक्षाच्या हितासाठी प्रयत्न करणार आहे.जयसिंग ढवळे व परमेश्वर खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ नेते कृष्णात बोबडे,नागेश बोबडे,अँड रूपेश बोबडे,सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, करमाळ्याचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे,खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ,भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष जयसिंग ढवळे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडीक,परमेश्वर खरात,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमरसिंह शेंडे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा