योगी आदित्यनाथ येईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही

नवी दिल्ली: नीचतेची बळी ठरलेल्या उन्नावच्या मुलीने जगाला निरोप दिला आहे, परंतु एका बाजूला देशातील आक्रोश जनता न्याय मिळण्यासाठी लढा ही लढत आहे. या घटनेवरून देशात संताप व्यक्त केला जात आहे. आज या युवतीवर अंत्यसंस्कार तिच्या गावात होणार आहेत. काल तिच्या भावाने सांगितले होते की, तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाही तर तिला दफन केले जाईल आणि गावातच एक समाधी बांधली जाईल. परंतु आता सीएम योगी आदित्यनाथ येईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील रुग्णालयात बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शनिवारी तिचा पार्थिव उन्नाव येथील तिच्या गावी आणण्यात आले. नव्वद टक्के जळालेल्या अवस्थेत २३ वर्षीय बलात्कार पीडित मुलीला गुरुवारी दिल्लीत हलविण्यात आले आणि उपचारासाठी तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री ११.४० वाजता रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उन्नावच्या मुलीवर डिसेंबर २०१८ मध्ये बलात्कार झाला होता. बलात्काराच्या वेळी आरोपीने त्याचा व्हिडिओही बनविला होता. यानंतर तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. कोर्टाच्या आदेशानुसार मार्च २०१९ मध्ये पोलिसांनी एफआयआर नोंदविला. यानंतर मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी याला तुरूंगात पाठविण्यात आले. मुख्य आरोपी नंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, परंतु त्यानंतर मुलीने जीव गमावला आहे. जामिनावर सुटलेले आरोपी कुटुंबीयांना सतत धमकावत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा