योगी सरकारने केले आणखी एका रेल्वे स्थानकाचे नामांतर…..

13

वाराणासी, १८ ऑगस्ट २०२०: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक रेल्वे स्थानकांचे नामांतरण केले. ज्यामध्ये आयोध्याचा देखील सामावेश आहे.

योगी आदित्यनाथ कट्टर हिंदूत्ववादी नेते असून त्यांनी रेल्वे स्थानकांचे नाव हे भारतीय संस्कृतीच्या विचारांवर ठेवत असल्याचे त्यांचे मत आहे, तर त्यांनी अनेक मुलाखतींमधे भारतातील अनेक स्थानकांची नाव बदलणार आसल्याचे स्पष्ट मत दिले आहे. तर आता या नामांतरणाच्या यादीत आणखी एका रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे.

वाराणासी जिल्ह्यातील मंडुआडिह या स्थानकाचे नाव आता बनारस असे ठेवण्यात आले आहे. अध्यात्मिक आणि सांस्कृतीकदृष्ट्या बनारस शहराचं महत्व लक्षात घेता योगी सरकारने रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला याबद्द्ल आपण त्यांचे अभारी आहोत, असे ट्विट वाराणसी मतदार संघाचे आमदार रवींद्र जयस्वालांनी यांनी म्हंटल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा