पंतप्रधान मोदी यांचे पहिले वहिले प्रचारसभेचे भाषण जनतेला नक्कीच प्रेरीत करणारे झाले आहे. यावेळी भाषणात मोदींनी अनेक मुद्द्यांना हात घातला. सबका साथ, सबका विकास, सबका ध्यास और सबका श्वास हे सूत्र उत्तरप्रदेशात राबवले गेले. त्याचा परिणाम आज यूपीत पहायला मिळत आहे. गरीबांना पक्की घरे हा मुख्य परिणाम पहायला मिळत आहे.यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की आधीच्या सरकारने पाच वर्षात केवळ ७५ पक्की घरे दिली होती तर योगी सरकारने एकुण २३,००० घरे दिली. हा फरक भाजप आल्यामुळे पहायला मिळत आहे.
यूपीत मुली आधीच्या सरकारच्या काळात घराबाहेर पडायला घाबरत होती. जनता यूपीसोडून बाहेर पळत होती, अशा बातम्या समोर येत होत्या. मात्र योगी सरकारने यूपीला अपराधमुक्त केले. त्यामुळे आज जनता स्वत:ला सुरक्षित मानत आहे.
भाजप सरकार कायम विकासाचा विचार करते. मुलींच्या विवाहाचे वयं २१ करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन मुलींना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. यावेळी त्यांनी नाव न घेतां अखिलेश यादव यांच्यावर टीकेची तोफ डागली. कोरोना काळात भाजपने गरीबांच्या घरांपर्यंत रेशन पोहोचवून त्यांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करुन दिले. पण आधीच्या सरकारने गरिबांच्या घरचे रेशन थेट दुकानातून पळवले.
अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी प्रकाश टाकला. आता छोट्या शेतकऱ्यांना योजना देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड किसान योजना,प्रधानमंत्री योजना,अनेक योजना राबवल्या आहेत. पण हे बदल भाजपने घडवून आणले आहेत. अशा अनेक मुद्दयांवर बोलताना मोदींनी अनेक योजना नमूद केल्या. तर विरोधकांना धारेवर धरले. गरीबांचे सरकार भाजप हे सूत्र कायम ठेवल्याने आज यूपीचा विकास झाला, असं ही मोदींनी नमूद केले. मोदींच्या या पहिल्या व्हर्च्युअल रॅलीमुळे यूपीच्या निवडणुकींवर काय परिणाम होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस