जपान मधील या तंत्रज्ञानाबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

टोकियो(जपान) : २७ ऑगस्ट,२०२० : जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे चालले आहे. जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असते. अर्थातच याचा आपल्याला रोजच्या जीवनात फायदा होतोच तसेच आपले कार्य ही सोपे होते. आज आपण जपान मधल्या अश्याच नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत. कोणी विचारही केला नव्हता की, लहान मुलं शाळेत न जाता सुद्धा घरबसल्या शिक्षण घेऊ शकतील परंतु तंत्रज्ञानमुळे सर्व काही शक्य आहे.
आपल्याला माहीतच आहे जपानमधील लोकं वेळेचा किती आदर करतात.जपानची प्रगती ही त्यांच्या शिस्तप्रिय स्वभाव आणि वेळेची कदर करण्याची वृत्ती असल्याने झाली आहे.तसेच यातच आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. आपण कुठे बाहेर फिरायला जातो, तेव्हा अनेकदा आपल्याला सार्वजनिक शौचालय वापरण्याची वेळ येते.तेथे आपल्याला स्वच्छतेचे पालन तर दिसतच नाही त्यात परत आपल्याला वाट पाहावी लागते ते वेगळेच.आता जपानने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.  आर्किटेक्ट शिगेरू बन यांच्या संस्थेने एक संकल्पना आणली आहे, ज्यामुळे टोकियो शहरातील शौचालय हे लोकांना क्षणभर चकित आणि मग कौतुकाला भाग पाडत आहे. आपण सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी जात असताना स्वच्छता असेल तरच तिथे पाऊल ठेवतो अन्यथा तिथे जात ही नाही .
याच बाबतीत टोकियो हे जगासमोर एक आदर्श ठेवत आहे. या शौचालयाची बनावट त्यांनी पारदर्शक पद्धतीने केली आहे. यात तुम्हाला बाहेरूनच दिसून येईल की आतमध्ये कोणी आहे की नाही आणि शौचालय किती स्वच्छ आहे. परंतु आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की पारदर्शक शौचालय आणि ते सुद्धा सार्वजनिक ठिकाणी मग याचा वापर करणार तरी कोण??  तर या प्रश्चाने उत्तर असे की, या शौचालयाची बनावट अश्या प्रकारे आहे की बाहेरून हे आपल्याला पारदर्शक दिसते परंतु एकदा आपण आत शिरलो आणि दरवाजा लॉक केला की हे शौचालय पारदर्शक राहत नाहीत. ही  निप्पोन फाऊंडेशनची  निर्मिती आहे. या कंपनी ला टोकियो टॉयलेट प्रोजेक्ट देण्यात आला आहे. तसेच ही कंपनी भविष्यात  आपण कधी विचार ही नसेल केला असे टॉयलेटचे प्रोजेक्ट राबवणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा