तुम्ही माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले पण ते चुकले, योग्य वेळ वाट पहा… एकनाथ खडसे

जळगाव, १७ ऑक्टोबर २०२०: एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मतभेद पाहण्यास मिळत आहे. भाजप आपल्याला योग्य ती वागणूक देत नसल्याचा आरोप खडसे यांनी वारंवार केला आहे. अलीकडच्या काळात खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात चालू होती. इतकेच काय तर आज म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी खडसे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार अशा चर्चा चालू होत्या. मात्र, आज तसे झाले नाही. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, योग्य वेळ येईल वाट पहा, त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आणखीनच चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाजप विषयी नाराज असलेले खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सातत्याने चालू आहे. इतकेच काय तर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात होता व त्यांना कृषीमंत्रीपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आज तसे झाले नाही याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितल्याने खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत होते. मात्र, खडसे यांनी आज जळगावातच ठाण मांडल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच त्यांनी आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला, असं खडसे म्हणाले. त्यावर योग्य मुहूर्त कोणता? असा सवाल त्यांना केला असता, योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं सूचक विधान खडसे यांनी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा