गोल पोस्ट गुन्हा “तु माझ्या वर बलात्कार कर, पण मला जिवे मारु नकोस. “………

“तु माझ्या वर बलात्कार कर, पण मला जिवे मारु नकोस. “………

भोपाळ, २० फेब्रुवरी २०२१: मध्य प्रदेश च्या राजधानी भोपाळ मधील कोलार या भागात २४ वर्षीय मुलीबरोबर असे दुष्कर्म झाले कि ती पुढील सहा महिने तरी बिछान्यातून उठू शकणार नाही. नराधम आरोपी ने पीड़ितेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात इतके मारले तिच्या पाठीचे हाड मोडले. डॉक्टरांना त्या मध्ये स्क्रू लावावे लागले. त्या बरोबर च पीड़ितेच्या डोक्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. बातमी नुसार नराधम आरोपी ने पीड़ितेबरोबर इतका वाईट व्यवहार केला की त्या नरधमाच्या दहशतीत मुलीने “तु माझ्या वर बलात्कार कर, मी कुणाला बोलावणार नाही, ओरडणार नाही, पण मला जिवे मारु नकोस. ” असे बोलली. पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमके काय प्रकरण……

पीडित मुलीच्या आईने सांगितले की ही घटना एक महिन्यापुर्वी घडल्याचे सांगितले. ती भोपाळ स्थित आपल्या घराच्या शेजारी ईवनिंग वॉक करत होती आणि त्याच वेळी सुनसान परिसर आणि अंधाराचा फायदा घेत एका मुलाने तिला धक्का दिला आणि जबरदस्ती करु लागला आणि लगातार मारहाण करु लागला. नंतर तो तिच्या वर दुष्कर्म करु लागताच पीडिता ओरडू लागली. तिच्या आवाजाने रस्त्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तेथून नराधम पळाला.

त्या नंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिची परिस्थिती नाजूक असल्याचे कळले. पीडितेवर नराधमाने असा अत्याचार केला होता की तिचे मनक्याचे हाड मोडलं आणि डोक्याला ही जब्बर मार लागला होता. जवळपास दहा दिवसापर्यंत तिच्या वर उपचार झाले.ती सध्या बेडवर आसून आजून सहा महिन्या पर्यंत तरी उठू शकणार नाही.

डाॅक्टरांनी तिच्या पाठीची शस्त्रक्रिया करून तिच्या पाठित राॅड बसवला आहे.तसेच काही स्क्रू लावले आहेत. तिला एका प्लास्टिकचे कव्हर मधे बेडवर झोपवण्यात आले आहे. ज्या मधे ती एक इंच ही हालु शकत नाही. ती जर हालली तर मग पाठित बसवलेला राॅड आणि स्क्रू ला काही होऊ शकते म्हणून असे करण्यात आले आहे.

ही घटना १६ जानेवारी ची आसून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाला आहे. पण, त्यामधे घटना स्पष्ट दिसत नाही. म्हणून काही साक्षीदारांच्या म्हणनानुसार एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी झाली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. धारा १५४ च्या अंतर्गत मामला नोंदवण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version