पुढच्या निवडणुकीत आमचे किती आमदार खासदार निवडुन येतील हे तुम्ही पहाच- आदित्य ठाकरे

चिपळूण २४ नोव्हेंबर २०२३ : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील पडलेल्या पुलाची आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. सरकारकडून या निकृष्ठ काम करणाऱ्या काँट्रॅक्टरला जर पुन्हा एक हजार कोटीचे काम देऊन पाठीशी घातल जात असेल तर हि दुर्दैवी गोष्ट आहे, अस मत आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूण येथे व्यक्त केल.

चिपळूण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी चिपळुण मधील विविध विषयांची माहिती घेतली.

येत्या काळात आमचे १६ आमदारांचे १६० आमदार होतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं, यावर शिंदे गटाकडून १६० नव्हे तर तुमचे सहा आमदार ही राहणार नाहीत अशी टीका केली होती. यावर बोलताना, मी गद्दार गटाला उत्तर देत नाही. आम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी काम करत आहोत त्यामुळे पुढच्या निवडणुकीत आमचे किती आमदार येथील हे तुम्ही पहाच,असे थेट आव्हानच आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा