कर्जत, दि. ८ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील नागपूरच्या शेतक-यांने कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने नागापूर येथील गणेश निभोरे वय वर्षे ३२ या युवक शेतक-यांने आर्थिक विवचनेतुन दि.७ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास स्वताःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या साहयाने गळफास लावून स्वतःची जीवन याञा संपवली.
गणेश निभोरे यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, तिन मुली असा परिवार आहे. दोन ते तीन एकर जमीन असलेल्या अल्प भुधारक शेतक-यांला काही दिवसांपूर्वी कांद्याने दगा दिला होता. शिकण्यासाठी नेलेल्या कांद्याला २ ते ३ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने गणेश हा निराश झाला होता.
या मुळे काही दिवस आर्थिक विवचनेमुळे मानसिक तणावात होता. घरची हालाकीची परिस्थिती आईचे सततचे आजारपण घरात तीन मुली अशा सर्व बाजूंन अडचणीत घेरलेल्या शेतकरी युवकांने अखेर गळफास लावून जगाचा निरोप घेतला.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन डाॅ.सुचेता यादव यांनी केले. तर पोलिस काॅस्टेबल गर्जे यांनी पंचनामा केला. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांनची मागणी केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष