गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा युवा पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

युवा पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बारामती, दि. १२ मे २०२०: बारामती शहरांमध्ये एका युवा पोलीस कर्मचाऱ्याने काल (११ मे) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. अलीकडच्या काळात ही दुसरी घटना आहे याआधी देखील एका अधिकाऱ्यांनी गोळी मारुन आत्महत्या केली होती. तुषार सानप (वय-३०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊन असून तुषार हे बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत होते. तुषार यांनी सुरुवातीला बारामती क्राईम ब्रांच पथकात काम केले. सध्या ते मागील दोन ते अडीच वर्षापासून बारामती मध्ये शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. मुलगी झाल्यानंतर तुषार यांनी सोशल मीडियावर मुलीच्या आगमनाची माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला होता. गरोदर असल्यामुळे त्यांची पत्नी माहेरी होती. त्यामुळे सध्या ते घरात एकटेच राहात होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version