“भारतमाता मला माफ कर” म्हणत तरुणीची आत्महत्या…..

पंढरपूर, १५ डिसेंबर २०२०: सैन्यात जाण्याचं स्वप्न उराशी बांधून जगणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरमधील आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त पीटीआय’नं दिलं आहे.

तरुणीला तीन व्यक्तींकडून सतत त्रास दिला जात होता आणि याच जाचाला कंटाळूनच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसानंतर सुसाईड नोट सापडली, ज्यामधे तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीनं तिचा हात पकडला होता तसंच याबद्दल कुठंही भाष्य करु नको असं धमकावलं होतं. याशिवाय आरोपी अनेकदा चिडवत असत. तर यामध्ये तिनं भारतमाता आणि आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. तरुणीनं सुसाईड नोटमधे आरोपींची नावंही लिहिली आहेत.

यामध्ये तिनं लिहिलं, लष्करी गणवेश परिधान करण्याचं आणि त्यावर तिरंगा असण्याचं आपलं स्वप्न सत्यात उतरणार नाही कारण, आपण सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत आहोत. अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भामसे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा