तरुणांनो, सावधान! मोबाईलचा अतिवापर मान आणि आरोग्यासाठी धोकादायक

65

पुणे ६ फेब्रुवारी २०२५ : तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप वापरल्यामुळे नवीन पिढीची मान पुढे झुकलेली किंवा वाकडी होत आहे. सोशल मीडिया आणि रील्सच्या व्यसनामुळे ही समस्या आणखीच वाढलेली दिसून येते. अलीकडेच, डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की स्क्रीन डिव्हाइसवर तासन्तास मान खाली घालून पाहिल्याने मान आणि पाठदुखीसह सुन्नपणा, जडपणा, पुढे वाकणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या वाढत आहेत.

नक्की समस्या कोणती ?

  • वाकलेली मान डोक्याच्या दुप्पट वजन हाडांवर टाकते.
  • या समस्येमुळे मानेची वक्रता कमी होते.
  • चालताना, उठताना आणि बसताना वेदना होतात.
  • वैद्यकीय शास्त्रात याला स्टेथनिंग स्पाइन, फ्लॅट बँक व रिस्टोलिस्थीसिस म्हणतात.
  • गेल्या दोन वर्षांत समस्यांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कारणे कोणती ?

  • तासन्तास एकाच स्थितीत मोबाईलवर व्यग्र असणे.
  • चुकीच्या स्थितीत बसून डिस्प्ले डिव्हाइस वापरणे.
  • तासन्तास बसून किंवा झोपून, मान वाकवून मोबाईल पाहणे.

धोका कुणाला?

रेडिओलॉजिस्टच्या मते, दररोज शहरी भागात १० पैकी ७ रुग्णांच्या एक्स-रेमध्ये मानेची समस्या दिसून येते. यात बहुतेक रुग्ण २५ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. डॉक्टरांनी रुग्णांसाठी स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी आणि योग्य पोश्चर राखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

उपाय कोणते?

  • चालण्याचा व्यायाम.
  • मान खाली वर करणे.
  • पाठीचे व्यायाम.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मान वाकडी होण्याची समस्या वाढू लागली आहे. तरुणाईमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे, मोबाईलचा वापर कमी करणे आणि योग्य पोश्चर राखणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे