गोल पोस्ट महाराष्ट्र गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मशानझुरवा जंगलात युवकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यु

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मशानझुरवा जंगलात युवकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यु

गोंदिया ४ सप्टेंबर २०२४ : गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मशानझुरवा जंगलात एका युवकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यु क्साल्याची घटना घडलीय. जंगल शिवारातील नाल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या पंकज छबिलाल गजभिये (वय २३ रा. बाम्हणी) या युवकाचा बुडून मृत्यू झालाय. ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने बाम्हणी गावात शोककळा पसरली आहे.

पोळ्याचा पाडवा असल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथील काही युवक खडकीटोला परिसरातील मशानझुरवा जंगल शिवारातील नाल्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी पंकज गजभिये देखील मित्रांसोबत आंघोळीसाठी नाल्यावर गेला. मात्र, आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती देवरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंकजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नविन दहिकर

error: Content is protected !!
Exit mobile version