गोल पोस्ट महाराष्ट्र घोगरगाव येथे युवकाचा भर रस्त्यात खून

घोगरगाव येथे युवकाचा भर रस्त्यात खून

श्रीगोंदा, दि. ३ जुलै २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा जागीच खून झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील रहिवासी सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सुनिल तरटे ही व्यक्ती दुचाकी गाडीला आडवी गेली असल्याच्या रागातुन दुचाकी वरील रोहित रमेश तरटे आणि शुभम तरटे या दोन्ही भावानी सुनिलला शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यात आली. त्या मध्ये दोन्ही भावांनी सुनिल यांच्या गुप्त अंगावर लाथ मारून त्यांच्या छातीवर जोरदार लाथ मारल्यामुळे सुनिल तरटे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच मुकेशकुमार बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असून यातील सर्व आरोपी रोहित रमेश तरटे आणि शुभम तरटे पसार झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version