अंबडमध्ये आढळला तरुणाचा मृत्तदेह, नातेवाईकांचा मृतदेहासह अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या

अंबड, जालना ४ जानेवारी २०२४ : गेल्या तीन दिवसापासुन अंबड शहरातुन बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणाचा तालुक्यातील भालगाव रोड वरील फकराबाद येथे काळ संध्याकाळी मृतदेह आढळुन आला. शवविच्छेदन झाल्या नंतर आज सकाळी मृतदेहासह नातेवाईकांनी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन सुरु केलंय.

अंबड शहरातील बाबरनगर येथील नारायण लिंबाजी बाबर हा २० वर्षीय तरुण हा, १ जानेवारी दुपारी पाच वाजेपासुन बेपत्ता झाला होता. याची अंबड पोलीस ठाण्यात दोन जानेवारी रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. नारायण चा शोध घेत असतांना काल सायंकाळी अंबड शहरापासून जवळ असलेल्या अंबड भालगांव रोड वरील फकराबाद येथे त्याचा मृतदेह आढळुन आला. आज गुरुवारी अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत मृतदेह ठाण्यात आणुन ठिय्या आंदोलन सुरु केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा