साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त युवकांनी केले रक्तदान

बारामती, दि. १ ऑगस्ट २०२० : बारामती शहरातील दत्ता सेवेकरी मंडळी यांच्या वतीने आज १ ऑगस्ट रोजी असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून अनावश्यक खर्चाला फाटा देत सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत सर्व तरुणांनी रक्तदान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. रक्तदान शिबीरात अनेक तरुण सहभागी झाले होते.

बारामती शहरात दर वर्षी अण्णाभाऊ साठे जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. मात्र सध्या कोरोना संसर्गाने हाहा:कार घातला असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दत्ता सेवेकरी मंडळातील तरुणांनी शासनाकडे असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान करण्याचा निर्णय घेतला यावेळी सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

दत्तासेवेकरी मंडळातील तरुणांच्या कार्याचे बारामती शहरात कौतुक होते आहे. रक्तदानासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात अनेक तरुण सहभागी झाले होते रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी चंद्रकांत सावंत, जालिंदर उगडे, यशवंत अवघडे, श्रीकांत पाथरकर, दिनेश सोनवणे, शुभम भिसे, कुणाल लांडगे, विजय मोरे, अविनाश दुर्वे, गणेश अघगडे, सनी अवगडे सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा