माढा, सोलापूर २४ डिसेंबर २०२३ : यन्दा फ़क्त ६०% भरलेल्या उजनी धरणातून ५ नोव्हेंबर पासुन कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सुरू असून हे पाणी वाया जात असल्याचा आरोप करत सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने उजनी धरणाच्या कालव्यावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यामुळे ऐन हिवाळ्यातच उजनीचे पाणी पेटल्याचे चित्र पहायला मिळाले.
आधीच कमी असलेला पाणीसाठा सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे खालावत चालला आहे. संक्राती नंतर शिल्लक पाणी मृत साठ्यात जाणार असून यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. जानेवारी नंतर पुढचे किमान आठ महिने तरी शेतीसाठीचे आवर्तन सोडले जाणार नसल्याने, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
यामुळे दोन दिवसात हे पाणी बंद केले नाही तर उजनी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, सचिन बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, जीवनराजे राऊत यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : संतोष वाघमारे