महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे युवराज संभाजीराजे यांचे आवाहन

17

नाशिक, १३ फेब्रुवारी २०२३ : कुठल्याही राजकीय पक्षांना आमचा विरोध नाही; मात्र इतर पक्षांच्या बरोबरीने वाटा घेणार असून, सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हा स्वराज्याचा असणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. महाराष्ट्र नवा निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील गोरगरीब लोकांचे समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असे स्वराज्य स्थांपन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केले.

गंगापूर रोड येथील गीताई लॉन्स येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने संभाजीराजे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संयोगिता राजे, युवराज शहाजीराजे, मुरलीधर पाटील, सुनील बागूल, माजी गटनेते विलास शिंदे, सुशीला गायकर आदी उपस्थित होते. यावेळी संभाजीराजे यांची ग्रंथ व पेढेतुला करण्यात आली.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. राज्यातील नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात केक कापण्यात आला. नाशिकसह राज्यभरातून स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. शाहीर स्वप्नील ढुमरे यांनी शाहिरी सादर केली. शिल्पा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा