माढा, १९ ऑक्टोबर २०२०: माढा तालुक्यातील मानेगाव गटातील सीना नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे व इतर बाबींचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी पाहणी करून तहसीलदार, महावितरणचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पंचनामे व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
रविवारी १८ ऑक्टोंबर रोजी मानेगाव, धानोरे, कापसेवाडी हटकरवाडी, बुद्रुकवाडी, खैराव, केवड, उंदरगाव, दारफळ गावांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली. सीना नदीच्या काठावरील तुर, कांदा, ऊस, मका, द्राक्ष, भूईमूग, डाळिंब आदी पिकांचे व ठिकठिकाणचे कच्चे रस्ते व पुल वाहून गेले आहेत. सीना नदीवरील पुलांचे कठडे व बेरिंग तुटून गेले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे वीजेचे खांब व डिपी पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा प्रत्यक्ष दुचाकी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दुरध्वनीवरुन संपर्क साधून एक ते दोन दिवसांत पंचनामे करण्याचे, वीजेच्या समस्या दूर करण्याच्या व नादुरुस्त रस्ते व पुल दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. नुकसान झालेल्या सर्वांनाच शासनाकडून अनुदान व मदत मिळवून देण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू असल्याचेही रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, माजी उपसभापती उल्हास राऊत, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब शिंदे, मंडल कृषी अधिकारी अनिल देशमुख, सरपंच संदीप पाटील, मोहन क्षीरसागर, वैजिनाथ सदगर, राजेंद्र खोत, प्रशांत चव्हाण, सिद्धेश्वर राऊत, तानाजी लांडगे, दिपक देशमुख, तानाजी देशमुख, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, शिवशंकर गवळी, महेबुब शेख, बाळासाहेब जोकार, बाबा पारडे, नंदकुमार देशमुख, राजाभाऊ भोगे, जालिंदर कापसे, बप्पा शेळके, नेताजी कापसे, पंडित पाटील, रामेश्वर नागटिळक, सुनील धर्मे, मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण, शिवाजी बारबोले, भारत देशमुख, सज्जन देशमुख, औदुंबर देशमुख, विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, मंगेश देशमुख, रविकांत चव्हाण, ऋषिकेश तांबिले, किरण चव्हाण, बालाजी नाईकवाडे, दिलीप चव्हाण, बादशाह शेख, नाना बागल, प्रमोद लटके, रमेश चव्हाण, कमलाकर दावणे,विलास देशमुख,नवनाथ शेळके, मनोज पारडे, विजय शिंदे, मोहन चव्हाण यांच्यासह गावोगावचे ग्रामस्थ, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील