ममता सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

मुर्शिदाबाद, १८ फेब्रुवरी २०२१: विधानसभा निवडणुका जवळ येत असताना बंगालमध्ये राजकारणाचा रक्तरंजित खेळ सुरू झाला आहे.  आता बंगालच्या ममता सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.  त्यानंतर लवकरच त्यांना तातडीने जंगीपूर उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.  मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमिता रेल्वे स्थानकाकडे जात होता, त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करण्यात आला.  झाकीर हुसेन कोलकाताला रवाना होणार होते.  ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ती जागा सुती पोलिस ठाण्यांतर्गत येते.
 ताज्या माहितीनुसार मंत्री झाकीर हुसेन यांना कोलकाता येथे आणले जात आहे.  मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे डॉक्टर एके बेरा यांचे म्हणणे आहे की, सध्या मंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे.
 दरम्यान, भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते यांच्यात झडप झाल्याची बातमी आहे.  एका प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी भाजप नेते फुलबागण परिसरातील उपायुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढत होते.  त्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.  दरम्यान, दोन्ही बाजूंनी वादविवाद झाला आणि परिणामी दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले.  दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विट आणि दगडांचा वर्षाव करण्यात आला, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दुखापत झाली.  भाजपच्या शिष्टमंडळात टीएमसीचे बंडखोर नेते (नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले) सुवेंदू अधिकारीही यात सहभागी होते पण त्यांच्यावर थेट हल्ला झाला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा