झेन टेकने एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट, ड्रोन बनवणारी भारतातील मोठी कंपनी

पुणे, 29 सप्टेंबर 2021: जेव्हापासून केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित नियम शिथिल करण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्सनं ऊसंडी मारली आहे. वास्तविक, झेन टेक्नॉलॉजीज ही एकमेव शेअर मार्केट लिस्टेड कंपनी आहे, जी भारतात ड्रोन बनवते.

केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित नियम सोपे केले आहेत, ज्यामुळं या कंपनीला फायदा होईल. झेन टेकच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात दुप्पट झालीय. 31 ऑगस्ट रोजी NSE वर या कंपनीचा स्टॉक 94 रुपयांच्या आसपास होता, जो एका महिन्यात वाढून आता 205 रुपये झाला आहे.

हे शक्य आहे की भविष्यात ई-कॉमर्स कंपन्या ड्रोनद्वारे होम डिलीव्हरी करतील. जर हे शक्य असेल तर ड्रोनची मागणी वाढू शकते आणि झेन टेक या क्षेत्रातील सर्वात मोठा खेळाडू आहे.
हैदराबादची झेन टेक्नॉलॉजीज कंपनी संरक्षण पुरवठ्यात आहे. कंपनीचं ऑर्डर बुक मजबूत आहे. कंपनीला अलीकडेच भारतीय हवाई दलाकडून सुमारे 155 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर बुक पुढे मजबूत राहील अशी अपेक्षा आहे.

झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रशिक्षण सिम्युलेटरच्या डिझाईन, विकास आणि निर्मितीमध्ये अग्रणी आहे. ही कंपनी शस्त्रे आणि संरक्षण उपकरणांसाठी सिम्युलेटर विकसित करते.

शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून, ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे, जिचं मार्केट कॅप सुमारे 1650 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापना 1993 साली झाली आणि तिचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनीचे संस्थापक किशोर दत्त अटलुरी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा