Zomato Company Name Change ७ फेब्रुवारी २०२५ : लाखो लोकांच्या मनात आपल नाव लोकप्रिय ठरलेल्या आणि घरबसल्या कधीही व कुठूनही सहज फूड मागवणाऱ्या कंपनीच नाव आता बदलण्यात आले आहे. गुरुवारी झोमॉटोच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झोमॅटोच नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता इथून पुढे कंपनीच नाव झोमॅटो न राहता “इटर्नल” या नावाने ओळखली जाणार आहे. अशी माहिती झोमॅटोचे सीईओ दीपिंडर गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात दिली. जरी कंपनीचे नाव बदलले असले तरी फूड डिलिव्हरी ब्रँडचे नाव आणि मोबाइल ॲपचे नाव झोमॅटोच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

आम्ही जेव्हा ब्लिंकिट विकत घेतले, तेव्हा कंपनी आणि ब्रँडमध्ये फरक करण्यासाठी अंतर्गतरित्या इटर्नल हे नाव वापरण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीचे संकेतस्थळ झोमॅटो.कॉम वरुन इटर्नल, कॉम होणार असल्याचे झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याचबरोबर आता शेअर मार्केटमध्ये सुद्धा झोमॅटोचे नाव बदलणार असून इटर्नल या ब्रॅंडखाली आता झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर या कंपन्या असतील.
शेअर बाजारातील स्थिती काय ?
झोमॅटोने नावात बदल केल्यापासून आज शेअर बाजारातील किंमत अर्ध्या टक्क्याने वाढली असून आता हा शेअर २३० रुपयांवर पोहोचला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर












































