निविदा अपात्र झाल्याने ZP कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचारी संघटना आक्रमक

धुळे १७ जुलै २०२४ : धुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या निविदा प्रक्रियेत निविदा अपात्र झाल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी पंकज वाघ यांना ठेकेदाराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून जिल्हा परिषदेच्या आवारात एकत्र येत ठेकेदाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेत पाच ठेकेदारांनी सहभाग नोंदवला होता. कागदपत्रांच्या तपासणीअंती तांत्रिक दृष्ट्या पाच पैकी तीन ठेकेदार अपात्र ठरले. निविदा प्रक्रियेत अपात्र केल्याच्या कारणावरून संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाचे कर्मचारी पंकज वाघ यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करत संबंधीता विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : भाग्यश्री बागुल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा