उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत शिवसैनिकांची इच्छा

मुबई: याआधी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु सध्या उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे अशी इच्छा शिवसैनिक व्यक्त करत आहेत अशा प्रकारचे फलक ही लावण्यात येत आहेत. अशा प्रकारचे फलक वांद्रे कलानगर येथे लावण्यात आले आहेत. फलकावर पुढीलप्रमाणे मजकूर आहे. “शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेनाप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे काळाची गरज आहे”. असे या फलकावर लिहिण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंनी जरी निवडणूक लढवली नसली तरी त्यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे आदित्य ठाकरे हे राजकारणामध्ये नवीन आहेत त्यांचा अनुभव कमी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे शिवसैनिकांना वाटत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा