गोल पोस्ट करमणूक यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऐका ऑडिओ मोडवर

यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऐका ऑडिओ मोडवर

यूट्यूबवरील गाण्याचा व्हिडिओ पाहायचा नसेल, तर फक्त ऑडिओ मोडवर गाणी ऐकणे शक्य होणार आहे. यूट्यूबच्या नव्या फिचरमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. 
 
या फिचरसाठी म्युझिक प्लेअरमध्ये वर एक टॉगल बटन दिसेल, यावर क्लिक केल्यास सुरू असलेले गाणे ऑडिओ अथवा व्हिडिओ प्रकारात चालू करण्याचा पर्याय दिसेल. त्यापैकी जो पर्याय निवडाल त्याप्रमाणे गाणे सुरू होईल.
 
यूट्यूबच्या अधिकृत म्यूझिक अ‍ॅपमधून 50 लाख गाणी मॅच केली आहेत. इतरही गाणी लवकरच मॅच करणार आहेत. यूट्यूब प्रिमियम व यूट्यूब म्यूजिक प्रिमियमच्या सर्व यूजर्ससाठी हे फिचर उपलब्ध आहे. अ‍ॅड्रॉईड व आयओएस डिव्हाईसच्या नवीन अपडेटमध्ये हे फिचर उपलब्ध झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version