आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे कोणतीही गोष्ट प्रमाणशीर, असेल तरच ती आपल्यासाठी फायदेशीर ठरते. आहाराच्या बाबतीतदेखील तसेच आहे. तुपाच्या सेवनाने फॅट्स शरीरात जातात, असा एक समाज आहे. मग ते चांगले कि, वाईट? तूप खावे कि, नाही या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत…
तूप हा प्रकार खास भारतीय आहे. जगात इतरत्र कुठेही तूप केले जात नाही. परदेशात क्लॅरिफाइड बटर नावाचा प्रकार असतो. खाण्याचा आणि रक्तातील चरबीचा घनिष्ठ संबंध नाही, हे सिद्ध झाले आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर चरबी निर्माण होणे शरीरासाठी अपायकारकच आहे.
खाण्यातील स्निग्ध पदार्थ बाद केले, तरी कोलेस्टेरॉल निर्माण होणे थांबत नाही. म्हणूनच ‘ऑइल फ्री’ खाऊनही काही फायदा नाही.
‘ऑइल फ्री’फास्ट फूड खात राहिले तरी चरबी खूप वाढू शकते. रक्तातील कोलेस्टेरॉल खूप वाढले तर हृदयविकाराचा झटका येतो. त्याचा आणि कमी तेल सेवन करण्याचा संबंध नाही. तात्पर्य, कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नये.