- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.
- पवार यांच्या या वक्तव्यामुळे खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे.
-
खडसे नाराज : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवार याद्यांमध्ये खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज असून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत.
- नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.