शेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पुरक उद्योग

 
 
▪ जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे.
▪ देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
▪ आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
 
शेळयांच्या जाती
1. दूध उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी.
2. लोकरी उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी.
3. विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन ,टोने,बर्ग,अल्पाईन,एम्लोन्यूबियन,अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.
4. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते.
5. आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
 
मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जाती
✔ उस्मानाबादी : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी]
✔ संगमनेरी : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी व दूधासाठी]
✔ सिरोही : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी व दूधासाठी]
✔ बोएर : बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी]
✔ सानेन : बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [दूधासाठी]
✔ कोकण कन्याळ: अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त [मांसासाठी]
 
बंदीस्त शेळीपालन   शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे. जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
 
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता 
 चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे, तेथे हे शेळीपालन शक्‍य होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा