कबड्डी निवड चाचणी 12 ऑक्टोबरपासून

▪ मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धेचे आयोजन 12 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2019 या कालावधीदरम्यान करण्यात आले आहे.
▪ हि स्पर्धा पुरुष, महिला, कुमार (मुले-मुली), किशोर (मुले-मुली) या सर्व स्थरांतील गटांसाठी होणार आहे असून ही स्पर्धा वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिर पटांगणात होणार आहे.
▪ या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2019 असून त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच यासाठीचे प्रवेश अर्ज सर्व संलग्न संघांना दिले गेले आहेत.
▪ अधिक माहितीसाठी  सायं. 07:00 ते 08:30 या वेळेत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई शहरचे प्रातिनिधिक संघ निवडले जातील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा