जॉर्जिया- 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेच्या राष्टाध्यक्षपदी राहीलेले जिमी कार्टर मंगळवारी 95 वर्षांचे झाले. अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष राहूनही त्यांनी साधी राहणी सोडलेली नाहीये. त्यांनी आपला वाढदिवसही साजरा केला नाही. एखाद्या व्यक्तीने या वयात ऐशो-आरामाचे आयुष्य जगले असते. पण, जिमी हे या वयातही न थकता गरिबांसाठी काम करत आहेत. ते आणि त्यांची पत्नी रोजलीन अमेरिका, आशिया आणि आफ्रीकेसहित अनेक देशात मागील 36 वर्षांपासून गरिबांना घरं बनवून देत आहेत. 1 ऑक्टोबर, 1924 रोजी जन्म झालेले जिमी कार्टर आज अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ जिवीत राहणारे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी जॉर्ज एच.डब्लू. बुश हे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष होते. बुश यांचे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. क्लिनिक नसलेल्या परिसरात जिमी यांनी क्लिनिक सुरू केले, नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या काही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांमध्ये जिमी कार्टर येतात. काही दिवसांपूर्वीच एका लहान शहरात अनेक महिन्यांपासून कोणीच फिजिशियन नव्हता, त्यानी त्या भागात क्लिनिक सुरू केले. इतकच नाही तर त्यांच्या भागातील अनेक घरांमध्ये वीज नव्हती. त्यांनी आपली संपत्ती देऊन त्या परिसरात वीज उपलब्ध करुन दिली.