मधुमेही आणि नवरात्रीचे उपवास…

नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा सण… ज्यांच्याकडे देवी कुलदैवत असते त्यांना नवरात्रीत हमखास उपवास
असतातच. उपवास करणाऱ्यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.
मधुमेही काळजी घ्यावी
▪ टाइप 2 मधुमेह आजार असणारे नवरात्रीचा उपवास ठेवू शकतात. परंतू याअगोदर डॉक्टराकडून आपल्या औषध संबंधी
सल्ला घेतला पाहिजे.
▪ उपवास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवे आणि प्रोटीनचा शरीराला पुरवठा असणे आवश्यक आहे.
▪ आपण या सर्व वस्तूंचा योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपवास
करण्याची ताकद मिळेल.
▪ या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे
गरजेचे आहे.
▪ जास्त वेळ उपाशी राहणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशात मधुमेह रुग्णांचं शुगर लेव्हल गडबडू शकतं.
▪ अशात घाम फुटणे, कंपन येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या येऊ शकतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा
त्रास असणार्‍यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास ठेवू नका.
▪ आणि उपवास करणे न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी आरोग्य आधी सांभाळायला हवे हे नक्की.
On Thu, Oct 3, 2019, 12:11 PM

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा