मयांक अग्रवालचे द्विशतक

बेंगलोर :भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटपटू व सलामीवीर मयांक अग्रवालने आपल्या करिअरमधील पहिले द्विशतक झळकावले आहे.
मयांकने हि कामगिरी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान केली आहे. मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या.
मयांक हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने टेस्टमधील आपले पहिले शतकाचे दुहेरी शतकात रूपांतरण केले आहे.
कसोटी पहिल्या शतकासह द्विशतक झळकावणारे भारतीय खेळाडू :
▪ 200* धावा : दिलीप सरदेसाई (विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई, 1965)
▪ 224 धावा : विनोद कांबळी (विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 1993)
▪ 303* धावा : करुण नायर (विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016)
▪ 215 धावा : मयंक अगरवाल (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम, 2019)
 भारताच्या सलामीवीरांनी कसोटीत एकूण 19 वेळा द्विशतकी खेळी करून इंग्लंडशी बरोबरी केली आहे. याचबरोबर रोहितच्या साथीने मयंकने अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहित आणि मयंकने पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड 317 धावांची भागीदारी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा