एच बी कमी आहे हि आजकाल प्रत्येकाची तक्रार असते. ते वाढण्यासाठी आपण काय काय उपाय सुद्धा करतो. आज असाच सोपा, घरच्या घरी बनवता येणारा एक पौष्टिक पदार्थ आपण शिकणार आहोत… तो म्हणजे खजूर लाडू!
साहित्य
- खजूर एक ते दीड वाटी
- गुलकंद २ मोठे चमचे
- खिसलेले खोबरे दीड वाटी
- वेलची पूड पाव चमचा.
कृती▪ खजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे. गुलकंद, खोबरे, वेलची व खजूर एकत्र करून चांगले मळून घ्यावे. मिश्रण एकसंध झाल्यावर छोटे छोटे लाडू करावेत.वैशिष्टय़ेकाहीही न शिजविता बनणारा पौष्टिक पदार्थ, रक्त कमी असणे, गर्भिणी, स्तनदा माता, लहान मुले, कृश व्यक्ती, पौगंडावस्थेतील मुले व मुली, क्षयरोग इ. अनेक ठिकाणी अतिशय उपयुक्त.