गोल पोस्ट राष्ट्रीय ‘बालाकोट’चा ‘तो’ व्हिडिओ जारी

‘बालाकोट’चा ‘तो’ व्हिडिओ जारी

           भारतीय वायु सेनेकडून बालाकोट हल्लाबाबत एक प्रमोशनल व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी बालाकोटवरील कारवाईचा व्हिडीओ जारी केला.
व्हिडीओत काय? : या व्हिडीओमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती व्हॉईस ओव्हरमधून देण्यात आली आहे.
पुलवामातील हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला आक्रोश, पाकिस्तानला धडा शिकवण्याची होत असलेली मागणी, त्यानंतर हवाई दलाने आखलेली हल्ल्याची योजना, वैमानिकांना देण्यात आलेल्या सूचना, विमानातील रडारवर दिसलेले दहशतवादी तळ, त्यावर विमानातून झालेली बॉम्बफेक दिसत आहे.
          एअर स्ट्राईक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसखोरी करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी हवाई दलाच्या फसलेल्या प्रयत्नाचा उल्लेखदेखील यात आहे.
error: Content is protected !!
Exit mobile version