मातृत्व आणि स्तनपान

मातृत्व हे खूप जबाबदाऱ्या घेऊन येतं. त्याचप्रमाणे आईमधील शारीरिक बदल आणि मानसिक तणाव देखील घेऊन येतं. जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हाच आईला मातृत्वाचं वरदान म्हणजे स्तनपान! नवीन मातांना स्तनपान आणि मातृत्व यांची सांगड घालताना कधी-कधी त्रास होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊ स्तनपान आणि त्याचे बाळासाठी असणारे फायदे…
  • आईचं दूध बाळाच्या वाढीसाठी सर्वतोपरी आवश्यक पोषकता पुरवणारं अलौकिक वरदान आहे. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  •  स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये एक अतूट भावनिक बंध तयार होतो, बाळाला मानसिक सुरक्षितता मिळते.
     
  • आईचं पहिलं दूध हे बाळासाठी अत्यंत पोषक असतं. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढतेच, मात्र आयुष्यभर बाळाचे विविध आजारांपासून संरक्षण या दुधामुळे होते.
  • आईच्या दुधातून ‘ई जीवनसत्त्व’ सुद्धा मिळतं, त्यामुळे रक्तकणांना संरक्षण मिळतं आणि नवजात बालकाला होऊ शकणारा काविळीचा त्रास टाळता येतो. 
  • आईच्या दुधातून ‘ई जीवनसत्त्व’ सुद्धा मिळतं, त्यामुळे रक्तकणांना संरक्षण मिळतं आणि नवजात बालकाला होऊ शकणारा काविळीचा त्रास टाळता येतो. 
  • आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचं दूधच पाजलं जावं. पुढे बाळ दीड ते दोन वर्षांचं होईपर्यंत आवश्यक प्रमाणात वरचं पोषक खाणं-पिणं आणि त्या जोडीला स्तनपान केलं जावं.
     
                                                                                                                               तुम्हाला हे माहित आहे का?:
     
● जन्मानंतर पहिले दोन दिवस बाळाचं पोट छोटंसं, एखाद्या चेरीएवढं असतं. 
● पुढच्या दोन दिवसांत पोटाचा आकार थोडा वाढून अक्रोडाएवढा होतो. 
● नंतरच्या दोन दिवसांत पोट ताज्या जर्दाळूएवढं होतं आणि नंतर वाढून अंडय़ाच्या आकाराएवढं होतं. म्हणजेच बाळाची  दुधाची भूक हळूहळू वाढत जाते. 
● जन्मानंतर पहिल्या तीन दिवसांत बाळाचं वजन कमी होतं, पण दहा दिवसांत परत जन्मावेळच्या वजनाएवढं होतं. 
● 4-5 महिन्यांत, बाळाचं वजन जन्मावेळच्या वजनाच्या दुप्पट होतं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा