उपवासाचा डोसा ……

उपवास आहे आणि पोट म्हणतंय काही तरी चटपटीत खायचंय…? तर मग प्रश्न असतो कि वेगळं तरी काय बनवावं?
उपवासाचा डोसा तुमच्या जिभेचे चोचले तर पुरवेलच त्याच बरोबर तुम्हाला उपवास देखील हवा हवासा वाटेल…
साहित्य : तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.,
चटणीसाठी : एक वाटी खोवलेले ओले खोबरे, एक मिरची,
चवीनुसार साखर, लिंबू, मीठ.
भाजीसाठी : तीन बटाटे उकडून, चमचाभर शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे.
कृती
▪ रात्री वरीचे तांदूळ आणि साबुदाणा नीट धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक वाटून
घेऊन एकत्र करावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून तीन तास झाकून ठेवावे. डोसे करतेवेळी नॉनस्टिक तव्यावर
वाटीने डोसे घालावेत.
▪ खोवलेले खोबरे, हिरवी मिरची मिक्‍सरमधून बारीक करावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ व लिंबू घालून चटणी तयार
करावी. भाजी करताना बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. भांड्यात तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी
करावी.
▪ नंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालून त्यात बटाटे व शेंगदाण्याचे कुट घालून भाजी तयार करावी.
बटर, हिरवी चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व्ह करावेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा