पुणे, ७ ऑगस्ट २०२५: भारताचा कर्णधार शुभमन गिलला बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा विआन मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत गिलने आघाडीवर राहून नेतृत्व केले आणि अनेक फलंदाजी विक्रम प्रस्थापित केले. भारताच्या युवा संघाने मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. मात्र, गिलने मालिकेत ७५.४० च्या सरासरीने ७५४ धावा केल्या असून त्यात चार शतकेही झळकावली. आणि त्याने एक द्विशतकही झळकावले.
गिलने गावस्करचा विक्रम मोडला…
२५ वर्षीय या फलंदाजाने सुनील गावस्कर यांचा मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम (७३२) मोडला. गिलची कामगिरी आता सर डोनाल्ड ब्रॅडमन (८१० धावा) नंतर सर्वकालीन कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सूरज गायकवाड












































