संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालयात रंगला बालआनंद मेळावा

डोर्लेवाडी: येथील संत शिरोमनी तुकाराम महाराज संकलित विद्यालयात आज शरद पवार यांच्या वाढदिवसाचे तसेच यमुनाबाई काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मैदान विद्यार्थी विक्रेते पालक खरेदीदार असे भरून गेले होते.

या बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन उदघाटन विद्यालयाच्या केंद्र प्रमुख जयश्री झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बाळासाहेब सलवदे,तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद भोपळे, सदस्य अश्विनी जाधव, पोपटराव भोपळे, लिमटेक शाळेचे मुख्याध्यापक जाधव उपस्थित होते.
या मेळाव्यात शाळेतील ४०० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात खाऊ गल्लीचे स्टॉल लावले होते तर ७० विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली होती. जवळपास ३०० पालकांनी सकाळपासून या आनंद मेळाव्याला भेट देऊन खरेदी केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले.
खाऊ गल्लीमध्ये भेळ, पाणीपुरी, अळूची वाडी, दहिवडा अशा विविध खाद्य पदार्थांची रेलचेल पाहायला मिळत होती. तसेच हे पदार्थ विद्यार्थी बाजारापेक्षा अर्ध्या किमतीत विकत असल्याचे मुख्याधिपिका सुषमा काळे यांनी सांगितले. तर भाजी मंडईमध्ये भाजीपाला खाणे का खावा व त्याचे असणारे फायदे पालकांना समाजून सांगितले.
शाळेच्या मैदानात मोठा आठवडे बाजार भरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. गुरुवार (दि.९) रोजी “आई” या विषयावर महाराज अमोल सुळ यांचे व्यख्यान ठेवण्यात आले आहे. तसेच दुपारी भोजनाचा व संध्याकाळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तसेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार (दि.१०) रोजी आंतर शालेय क्रीडा स्पर्धा तर शनिवार (दि.११) रोजी आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार (दि.१२) रोजी भव्य जिजाऊ जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लेझीम, ढोलपथक, घोडे मिरवणुकीत सहभागी होणार असुन दुपारी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच संध्याकाळी बक्षीस समारंभ असल्याचे अध्यक्ष महादेव काळे यांनी यावेळी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा