मुंबई :मारुती सुझुकी कंपनीने आपली बहुचर्चीत एसयूवी एस प्रेसो लॉन्च केली आहे. राजधानी दिल्ली येथील एका शोरुममध्ये या गाडीची किंमत 3.69 लाख रुपये तर, हाई व्हर्जनची किंमत 4.91 लाख रुपये इतकी आहे.
Maruti S-Presso चार व्हेरिएंटमध्ये आहे. ज्यात Standard, LXI, VXI, and VXI+ असे पर्याय आहेत. कारमध्ये 10 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
फिचर्स
● मारुती एस-प्रेसो कार 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
● ज्यामध्ये स्टँडर्ड, एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय प्लस याचा समावेश आहे.
● यात 1.0 लीटरचे सिलेंडर बीएस 6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
● या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स देण्यात आला आहे.
● ही कार रेनो क्विडपेक्षा जास्त उंचीची आहे. तर लांबी, रुंदीच्या बाबतील ती रेनो क्विडपेक्षा छोटी आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस-प्रेसो कारमध्ये एबीएस, स्पीड वॉर्निंग सिस्टम, ईबीडी, रियर पार्किंग सेंसर्स, हाय स्पीड अलर्ट, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेंशनरआणि लोड लिमीटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.