११९ च्या आकड्याच्या साह्याने सरकार बनवेल: भाजपा

नवी दिल्ली: एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करीत असताना, भाजपने गुरुवारी महाराष्ट्रातील खेळात परत येण्याचे संकेत दिले. २८८ सदस्यांच्या सभागृहात मॅजिक फिगर १४५ पर्यंत कसे पोहोचेल याचा खुलासा न करता महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा भाजप पक्षाने केला आहे. २१ ऑक्टोबरच्या निवडणुकीत पक्षाला १०५ जागा मिळाल्या होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि अपक्षांच्या पाठिंब्याने आमची संख्या ११९ वर पोहचली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपचेच सरकार स्थापन होणार आहे.”
सत्ता स्थापने वरून आणि मुख्यतः मुख्यमंत्री कोणाचा असेल या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद झाला होता त्यामुळे भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिला होता. परंतु आता भाजप सरकार सत्ता स्थापनेच्या खेळांमध्ये पुन्हा सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या आमदारांची दक्षता घेत आहे जेणेकरून कोणताही आमदार फुटू नये. भाजप आमदार फोडाफोडीच्या राजकारणात तरबेज असल्याचा आरोप केला जात आहे.
पुढचे सरकार आमचे च असेल असे वक्तव्य ही संजय राऊत यांनी पुन्हा केले आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे संजय राऊत वारंवार सांगत आहेत.
गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेनेच्या नेत्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा (सीएमपी) मसुदा तयार केला, जो तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा