सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील १ आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार

पंजाब, २ ऑक्टोंबर २०२२ : प्रसिध्द पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेस चे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. सिध्दू मुसेवालाला गोळ्या घालणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळं पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

तसेच पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड दीपक टिनू हा मानसाच्या सीआयए कर्मचार्‍यांच्या ताब्यातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसा सीआयए स्टाफची टीम त्याला कपूरथला जेलमधून रिमांडवर आणत होती. यावेळी पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन तो पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. ANI वृत्तानुसार, मानसा पोलिसांनी दीपक टिनू फरार झाल्याची पुष्टी केली आहे.

प्रसिध्द पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेस चे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला यांना २९ मे २०२२ रोजी मानसा येथे त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाब मध्ये आलेल्या आम आदमी पार्टी च्या सरकारने त्यांची सुरक्षा व्यवस्था काडून. घेतल्या नंतर अवघ्या २४ तासा च्या आत त्यांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये दीपक टिनूचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली असून, चकमकीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा