बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून एक कोटी ३३ लाखांची मदत

पुणे, दि.६ मे २०२० : कोरोनाच्या महामारीने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरातच बसून आहोत.
या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, साफ सफाई, कर्मचारी, रात्रंदिवस प्रयत्न करून या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कोरोनाच्या महामारीने सर्व उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. कुणाच्याही हाताला काम राहिलेले नाही. यात वकिली व्यवसाय करणारे वकिलही आता अडचणीत येऊ लागले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात दीड लाख वकील बांधव आहेत.त्याच्यामध्ये पहिल्या पाच वर्षातील प्रॅक्टिशनर वकीलांचे कुटुंब दैनंदिनी उत्पन्नावर चालते . अशा बिकट परिस्थितीमध्ये या वकील बांधवांना मदत करण्याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे सर्व कौन्सिलर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाने एक कोटी ३३ लाख रुपये एवढी मदत जाहीर केलेली आहे.

यात प्रत्येक जिल्ह्यांमधून वकिलांचे नाव ,फोन नंबर यादी मागवून घेतली जाणार आहे. ती यादी आल्यानंतर त्या-त्या जिल्ह्यातील कौन्सिलर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किट्सचे वाटप करत आहेत. त्या किट्समध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजे तेल ,गहू, साखर, तांदूळ, इतर साहित्यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेषत: किट्स देताना त्या जिल्ह्यातील एखाद्या दुकानदाराला ते किट्स बनवण्यास सांगितले जाते व त्याचे वितरण तेथील कौन्सिलर यांच्यामार्फत केले जाते. हा स्तुत्य उपक्रम प्रथमतः धुळे जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात किट्सचे वाटप करून झालेला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बार कौन्सिल मेंबर ऍडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी गरजू वकील बंधू-भगिनींना हे किट्स दिले आहे. पुणे शहरामध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे कोणतेही वकील गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयात गेलेले नाहीत. अशा बिकट परिस्थितीमध्ये बार कौन्सिलची ही मदत संजीवनीच वाटत आहे.

अशी मदत जाहीर करण्याकरिता बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले आहेत ,अशी माहिती बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष ऍड. अमोल सावंत यांनी नुकतेच दिलेले आहे.
या उपक्रमात पाच वर्षाखालील प्रॅक्टिशनर वकिलांनी सहभाग नोंदवावा, त्यांची नावे कळवावीत ,जेणे करून बार कौन्सिलला या पहिल्या टप्प्यात मदत देता येईल, असे आवाहन वकील प्रमोद पाटील यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा