पुण्यात दिवसभरात नवे १ हजार ०८२ कोरोनाबाधित!

14

पुणे, १६ मार्च २०२१: पुणे शहरात काल नव्याने १ हजार ०८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख १९ हजार २८५ इतकी झाली आहे. शहरातील ६७८ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ०२ हजार ३३९ झाली आहे.

दिवसभरात ७ हजार २६६ टेस्ट

पुणे शहरात काल एकाच दिवसात ७ हजार २६६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १२ लाख ५५ हजार ६५२ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ११ हजार ९८४ रुग्णांपैकी ३७० रुग्ण गंभीर तर ७७६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ९६२ इतकी झाली आहे.

◆उपचार सुरु : ११,९८४
◆ नवे रुग्ण : १,०८२ (२,१९,२८५)
◆ डिस्चार्ज : ६७८ (२,०२,३३९)
◆ चाचण्या : ७,२६६ (१२,५५,६५२)
◆ मृत्यू : १० (४,९६२)

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे