अबब…१० फलंदाज शून्यावर बाद!

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये फलंदाज काय कमाल करू शकतात याचा नुकताच प्रत्यय आला आहे. नेपाळच्या महिला गोलंदाजांनी आपल्या अप्रतिम कामगिरीमूळे प्रतिस्पर्धी संघातील एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १० गोलंदाजांना एकही धाव काढू न देता बाद केले आहे.
काठमांडू येथे दक्षिण आशियाई क़्रिडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या नेपाळ आणि मालदीव यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात हे घडले आहे.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मालदीवने ११.३ षटके खेळून फक्त ८ धावा काढल्या.त्यातही फक्त १धाव फलंदाजाने काढली असून बाकी धावा अवांतर होत्या.
सलामीवीर आमिया एसाथ हिने १२ चेंडूत १ धाव काढली तर इतर सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले.

नेपाळकडून अंजली चंदने ३ षटके निर्धाव टाकली, तर १ धाव देत ४ फलंदाज बाद केले.
यानंतर सीता राणा, रुबिना बेलबाशी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ९ धावांचे लक्ष्य समोर ठवून नेपाळच्या संघाने फक्त ६ चेंडूत लक्ष्य गाठले व सामना जिंकला.
दरम्यान, याआधी अंजली चंदने ६ फलंदाजांना बाद करताना एकही धाव दिली नव्हती. आता या सामन्यातील ४ बळींमुळे तिच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यात १० विकेट जमा झाल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा