भंडारा जिल्हातील रूग्णालयात आग लागल्याने १० नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू

भंडारा, १० जानेवारी २०२१: महाराष्ट्रातील भंडारा जिल्हातील सामन्य रूग्णालयात आग लागल्याने १० नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अचानक अतिदक्षता विभागात नवजात केयर युनिट मधे आग लागली. यामुळे एकूण १७ बालक दाखल होती. धूर निघत आसल्याचे नर्सला दिसले.तिने तातडीने सर्वांना माहिती दिली. अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. सात बालकांना वाचवण्यात यश आले.तर आग शाॅट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.

भंडार्यातील घटनेवर देशभरातील अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.तर तसेच राजकारणातून ही प्रतिक्रिया आल्या आहेत…..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली भावना….

भंडार्यातील घटने मधे गुदमरून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देत “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हात मन हेलावून टाकणारी घटना घडली आसून नवजात बाळांनी आपला जीव गमवला, नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या बद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला अशा आहे की जख्मी बालके लवकरात लवकर बरे व्हावेत.” अश्या शब्दात मोदींनी भावना व्यक्त केल्या.

वेदनादायी : राहुल गांधी…..

भंडार्यातील अतिदक्षता नवजात शिशू केयर युनिट मधे आग लागल्यामुळे १० बालकांचा मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रातील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांचा कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करावी.” असं त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले दुख…..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत काही निर्णय घेतले आहेत. ज्ञभंडार्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील अन्य रूग्णालयातील शिशू केयर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेत पृर्ववत सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत.

विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले……

भंडार्यातील या घटने मुळे संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे दुःख व्यक्त करून कुटुंबीयांच्या दुःखाचे सांत्वन करत आहे. तर विरोधक मात्र या घटनेचा दोषी सरकारला मानत आहे.भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत, भंडारा जिल्ह्यातील हाॅस्पिटलमधे १० निष्पाप बालकांचा मृत्यू हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. असा आरोप त्यांनी केला.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हि घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आसल्याचे म्हटंले. राज्यातील आरोग्य व्यवस्था अद्ययावत आसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जातो. मात्र या घटनेने दाव्यांची सत्यता उघड पडली. याची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा