पुरंदर, १७ फेब्रुवरी २०२१: गुळुंचे येथे राहणारे प्राथमिक शिक्षक योगेश कर्नवर यांचा दोन महिन्या पूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला शिक्षक पतसंस्थेच्यावतीने काल( दि.१६) दहा लक्ष रुपयाची मदत देण्यात आली. गुळूंचे येथे त्यांची पत्नी संध्या योगेश कर्णवर यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
पुरंदर शिक्षकपत संस्थेच्यावतीने आकस्मित मृत्यू होणाऱ्या शिक्षकांसाठी सभासद कर्ज संरक्षण ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सभासदांकडून १५ हजाराची ठेव घेतली जाते. या ठेवीच्या येणाऱ्या व्याजातून वर्षभरात जर कोणत्या शिक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना १० लक्ष रूपयाची मदत दिली जाते. असे संस्थेचे चेअरमन वसंत कामथे यांनी सांगितले. कर्नवर यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी संध्या कर्नवर यांना संस्थेने ही मदत देण्यात आली आहे. त्याच बरोबर तालुक्यातील शिक्षकांनीही ५० हजार रुपयाची रोख मदत दिली आहे.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कामथे, व्हा. चेरमन सुनील कांबळे, गणेश कामथे, संदीप जगताप, सुनील लोणकर, कांचन निगडे, नाना जोशी, महादेव माळवदकर, अनिल चाचर, संदीप कदम, मनोज साटाले, शिवप्रसाद कर्णवर, नंदकुमार चव्हाण, संतोष रासकर, सुरेश जगताप, सलीम शेख, सुनील जगताप, भाऊसाहेब बरकडे, कर्नवर यांचे सासरे उत्तम धोंडीबा लवटे, आदी उपस्थित होते.
गुळूचे येथील राष्ट्रवादीचे नेते कांचन निगडे यानी शिक्षक पत संस्थेच्यावतीने सुरू केलेल्या उपक्रमाचं कौतुक केले. त्याच बरोबर शिक्षकांनी स्वतः वर्गणी काडून ५० हजाराची मदत केल्याबद्दल आभार मानले.
न्युज अनकट प्रतीनीधी: राहुल शिंदे