परभणीच्या सेफ्टी टॅक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत

परभणी, १२ मे २०२३: परभणी शहराजवळील गंगाखेड रोडजवळील भाऊचा तांडा शिवारातील आखाड्यावर असलेल्या सेफ्टी टॅकची सफाई करताना ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांना प्रत्येकी १० लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घोषित केली आहे.

सोनपेठ शहराजवळील भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

काल रात्री भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅकमधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारांस गंभीर अवस्थेमध्ये अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा